फलटण – फलटण शहर हे वाढत्या लोकसंख्येचा शहर म्हणून नावारूपास येत आहे .तसेच पंढरपूर पालखी महामार्गावरील मध्यवर्ती शहर म्हणून फलटणची ओळख निर्माण झाली आहे .या सर्व बाबींचा विचार करता फलटणमध्ये एक नवीन अद्यावत बस स्थानक होणे ही काळाची गरज आहे जनतेच्या मागणीनुसार ही आवश्यक बाब झाली आहे.त्यामुळे शासनाकडे पाठपुरावा करून नूतन अत्यावत बसस्थानक उभारण्यास मान्यता घेतली आहे असे आ.सचिन पाटील यांनी स्पष्ट केले.
फलटण बस स्थानक वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या पाहता बस स्थानकावर सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी व नूतन अत्यावत बस स्थानक निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी मी व मा.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने. शासनाने निर्णय केला .महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध जागावर सार्वजनिक खाजगी सहभाग (PPP) या तत्वावर प्रकल्प राबविण्याकरिता तज्ञ प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या पटलावर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी यास मंजुरी दिली असून. त्यामुळे लवकरच फलटण बस स्थानकाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होणार असल्याचे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले आहे.
या ठिकाणी अद्यावत बस स्थानक उभा राहील त्याचबरोबर अद्यावत व्यापारी संकुल उभारले जाणार आहे त्यामुळे त्या परिसरातील येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्याच्या सुविधा उपलब्ध होतील तसेच नागरिकांनाही त्याचा फायदा होईल. त्यामुळे बऱ्याच वर्षापासून फलटण तालुक्यातील जनतेची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे.. त्यामुळे आमदार सचिन पाटील यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहे.