स्थानिक

ॲड विश्वनाथ टाळकुळे व डॉ. हेमंत बेडेकर यांचा उषःकाल सन्मान पुरस्कार प्रदान 

 फलटण – फलटण मधील प्रसिद्ध शिक्षीका आणि प्रसिद्ध ज्योतीष तज्ञ कै. सौ. उषा दाणी-विभुते यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा उषःकाल सन्मान पुरस्कार २०२५ ॲड विश्वनाथ टाळकुळे आणि डॉ हेमंत बेडेकर यांना खास समारंभात प्रदान करण्यात आला.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खंडाळा येथील ज्येष्ठ विधिज्ञ बाळासाहेब पंडीत हे उपस्थित होते. प्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डॉ प्रसाद जोशी अध्यक्षस्थानी होते.
व्यासपीठावर संजय पालकर, रविंद्र फडतरे, संजय चिटणीस व उषःकाल प्रतिष्ठानचे श्रीपाद विभुते उपस्थित होते.
यावेळी ॲड विश्वनाथ टाळकुटे यांना ॲड बाळासाहेब पंडीत व डॉ. प्रसाद जोशी यांनी सन २०२४ चा उषःकाल सन्मान पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर डॉ. प्रसाद जोशी यांनी डॉ. हेमंत बेडेकर यांना सन २०२५ चा उषःकाल सन्मान पुरस्कार प्रदान केला. रोख रक्कम ५०००/- रूपये, श्रीफल, शाल, बुके व स्मृतिचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते.
मुधोजी हायस्कूल फलटण येथे जीवशास्त्र विषयात इयत्ता १२वी मधे प्रथम आलेली विद्यार्थीनी कु.सुरूची नाळे, हिला रोख रू. ११००/- प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह डॉ. प्रसाद जोशी यांचे हस्ते देवून तिचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय सुभाष देशपांडे, चंद्रशेखर दाणी आणि सौ. मेघा सहस्त्रबुद्धे यांनी करून दिला. सौ. मिना बेडेकर आणि विश्वनाथ टाळकुटे यांचे सुविद्य पत्नी सौ. टाळकुटे यांचाही सत्कार सौ. मेघा सहस्त्रबुद्धे यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. दिपाली निंबाळकर यांनी केले.

आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे ॲड बाळासाहेब पंडीत यांनी अ.भा.वि.प. चा त्या काळातील प्रवास आठवून सामाजिक बांधिलकीचे शिक्षण मिळाले, आणि त्याचा सामाजामध्ये काम करताना निश्चित उपयोग होत आहे असे मत व्यक्त केले. दाणीबाई यांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर सामाजिक बांधिलकीची शिकवण देवून अनेक विद्यार्थ्यांना तयार केले.

ॲड विश्वनाथ टाळकुटे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना मला दिलेला हा पुरस्कार सर्वश्रेष्ठ असून आयुष्याच्या जडण घडणीत माझी आई कै. सौ. मालन आणि कै. सौ. उषा दाणी यांचा सिंहाचा वाटा आहे. या दोघींनी दिलेले संस्कार, माझे सर्व सहकारी आणि माझे कुटुंबिय यांचे प्ररेणेने माऊली फौंडेशनचे काम आजपर्यंत सुरू आहे. यावेळी त्यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रू.२५०००/- ची मदत जाहिर केली.

डॉ. प्रसाद जोशी यांनी दाणी बाईच्या कार्याचा गौरव करून त्यांनी मला वेळोवेळी बहुमोलाचा सल्ला दिला. माझ्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. हॉस्पीटलच्या उभारणीमध्ये त्यांनी दिलेल्या सुचना आजही मी तंतोतंत पाळतो. दाणी बाई आजारी असताना सुध्दा आपले दुखणे बाजुला ठेवून त्यांनी आलेल्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

डॉ. हेमंत बेडेकर यांनी “बांबु लागवड” त्याच्या जाती, जगातील उत्पन्नाची ठिकाणी याबद्दल बहुमोलाची माहिती देवून शेतकऱ्यांना या व्यवसायात येण्याचे आवाहन केले. बांबुमध्ये आज चिन देश हा प्रगतीपथावर असून भारतामध्येही त्याचे लागवडीचे प्रमाण हळु हळु वाढत आहे.शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा प्रयत्न जरूर करावा .

या कार्यक्रमाचे वेळी धनश्री बेडेकर लिखीत “शोधक संशोधक” या पुस्तकाचे प्रकाशन व्यसपिठावरील मान्यवरांचे हस्ते झाले. धनश्री बेडेकर हिला शाल व गौरव चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.कु. स्वधा गोसावी, पुणे हिचा गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला आभार ढेकळे सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button