फलटण – माजी नगरसेवक बुद्धवासी गणेश अहिवळे यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अहिवळे यांच्या वतीने मोफत 200 टी-शर्ट चे वाटप करण्यात आले.
बु.माजी नगरसेवक गणेश अहिवळे यांच्यास्मरणार्थ भीमनगर व मंगळवार पेठ फलटण येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कार्यालय येथे जिल्हा सचिव आरपीआय विजय येवले, संघटक पश्चिम महाराष्ट्र मधुकर काकडे, जिल्हा सदस्य संजय निकाळजे, तेजस काकडे, सुरेश भोसले, रोहित माने , निलेश मोरे ,विजय मोरे ,गणेश भोईटे, बापूराव भोसले, दादा मोरे, मनोज दांडोरे ,दादा येवले, राजू शिंदे, राजू जाधव सर्व मान्यवर उपस्थित होते.
संजय निकाळजे यांनी बु. माजी नगरसेवक गणेश अहिवळे यांच्या सामाजिक कार्याला उजाळा देऊन त्यांचा वारसा प्रशांत आहिवळे चांगल्या पद्धतीने चालवित असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रशांत अहिवळे, सामाजिक कर्यकर्ते महादेव गायकवाड यांनी सर्व पदाधिकाराचे आभार व्यक्त केले.