फलटण – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक पार पडून निवडणुकीच्या दृष्टीने आ.सचिन पाटील यांनी सर्वांशी चर्चा केली.
फलटण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महायुतीचे पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक आमदार सचिन पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तुकाराम शिंदे,माजी नगरसेवक अशोकराव जाधव, शिवसेनेचे समन्वयक विराज खराडे, नानासाहेब इवरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबुराव पवार, शहर अध्यक्ष निलेश तेलखडे , भाजप शहर अध्यक्ष बापूराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष राहुल निंबाळकर, माजी नगरसेवक सचिन अहीवळे , मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, , युवा मोर्चा शहर अध्यक्ष नितीन जगताप व महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्रित रित्या ताकदीने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.