फलटण – फलटण शहर शिवसेना शिंदेगटच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी भाविकांना विनामूल्य आरोग्य शिबिर ,अल्पोपहार आणि पाणी बाटलीचे वाटप करण्यात आले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, संपर्कप्रमुख शरद राव कणसे, एकनाथ ओंबाळे, शारदाताई जाधव, अविनाश फडतरे, यांच्या मार्गदर्शनातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व फलटण शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांना विनामूल्य आरोग्य शिबिर व अल्पोपहार आणि पाणी बाटलीचे वाटप शहर प्रमुख निलेश तेलखडे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पवार लाळासाहेब साबळे ,स्वप्नील दोशी , नंदिनीताई गायकवाड, समीर गायकवाड, जयदीप गुंजवटे, प्रसाद काटे, शंभूराज शिंदे,डॉक्टर सुनील खोत, विजय तेलखडे,यश राऊत, श्रवण जाधव, शंतनु जाधव, शंभू राऊत,हेमंत सुतार , अभिजित निंबाळकर आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
Back to top button
