फलटण – यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे स्वर्गीय कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 66 वा स्मृतिदिन साजरा करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण व सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज फलटण या चारही शाखांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 66 वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी , उपाध्यक्ष सी एल पवार , संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते स्व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मधून प्राध्यापक यादव एस डी यांनी कार्यक्रमाचा हेतू व उद्देश सांगितला. रसायनशास्त्राचे प्राध्यापक वाघ जी बी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्याचा जीवनपट थोडक्यात व्यक्त केला.
नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयाचे विज्ञान विभागाचे प्राध्यापक शेख सर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य व्यक्त केले.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. त्यांना कर्मवीर अण्णांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला, त्यांचे कार्य प्रत्यक्ष पाहता आले अशा अनेक आठवणींना त्यांनी आपल्या मनोगतातून उजाळा दिला.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी आपल्या मनोगतातून श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ऋणानुबंध आपल्या मनोगतातून व्यक्त केला व गतकाळातील अनेक आठवणी या दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दलच्या सांगितल्या. आजच्या पिढीने कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आचरणात आणून पुढे घेऊन जावेत अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे प्र.प्राचार्य पी डी घनवट यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राऊत एस एन तर आभार प्रा सौ धुमाळ एस जी यांनी मानले.