फलटण : श्री रंगारी महादेव मंदिर हे फलटण मधील एक प्राचीन आणि श्रद्धास्थान असलेले मंदिर आहे. येथे नियमितपणे विविध धार्मिक विधी आणि उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरे केले जातात. मंदिराच्या स्थापत्यशास्त्रात पारंपरिक मराठी शैलीचे सौंदर्य दिसून येते, जे भाविकांना एक आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते.

या मंदिरातील शिवपिंड शेकडो वर्षे जुनी असून, दैनंदिन अभिषेकामुळे शिवपिंडीची झीज झाली होती. त्यामुळे दिनांक २८ मे २०२५ रोजी वज्रलेप प्रक्रिया अत्यंत श्रद्धापूर्वक आणि यशस्वीरित्या पार पडली. या पवित्र कार्यानंतर दुपारी ११:४० वाजता अमृत शुभ मुहूर्तावर शिवपिंडीचे प्रथम दर्शन विधी संपन्न झाला.
या पवित्र विधीच्या निमित्ताने, फलटण संस्थानचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते महादेवाची महाआरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली.
या प्रसंगी मंदिर परिसरातील नागरिक व बंधू भगिनी व भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.
Back to top button
