फलटण – शिकलगार समाजातील विद्यार्थ्यांना यूपीएससी ,एमपीएससी परीक्षा संबंधी मार्गदर्शन मिळावे समाजातील मुले विद्यार्थी या क्षेत्रामध्ये उतरावीत व वरील परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन शिकलगार समाजाचे नाव उज्वल करावे अशी सातत्याने मागणी समाजातून करण्यात येत होती त्यास अनुसरून संघटनेचे अध्यक्ष नौशादभाई शिकलगार यांनी यूपीएससी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मिशन यूपीएससी कार्यशाळेची आयोजन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नौशादभाई शिकलगार यांनी बोलताना सांगितले की शिकलगार समाजासाठी शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविताना मैदानी स्पर्धा विविध स्पर्धा यापूर्वी छोट्या मोठ्या प्रमाणात घेतल्या आहेत.
समाज एकजूट व एकसंघ व्हावा यासाठी प्रयत्न करून समाज एका प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये चमकावेत यासाठी वेळोवेळी गुण गौरव समारंभ आयोजित केलेच परंतु एवढ्यावरच न थांबता समाजातील मुले विद्यार्थी युपीएससी, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्चस्पद व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे त्यास अनुसरून मुंबई, पुणे सातारा, सांगली व इतर सर्व जिल्ह्यातील समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच कार्यशाळेचे आयोजन करणार आहोत. 15 जून पर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले नावे अमीर शिकलगार मोबाईल नंबर 8600285158 या क्रमांकावर बायोडाटा सहित पाठवावीत या कार्यशाळेमध्ये विविध वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहेत. लेखी परीक्षा तोंडी परीक्षा प्रश्न उत्तरे घेण्यात येणार आहेत इच्छुक विद्यार्थ्यांनी या मिशन यूपीएससी योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन नौशाद शिकलगार यांनी केले आहे.