फलटण – महाराष्ट्र राज्य महात्मा फुले विचार अभियान, सुजन फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्त सौ अलका बेडकिहाळ यांच्या हस्ते येथील सौ रुपाली कचरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युवा उद्योजिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव, बापूराव सुळ, सर्जाकार लेखक सुरेश शिंदे, तुकाराम कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ रुपाली कचरे या सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.या त्यांचे कार्याची दखल घेऊन त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने युवा उद्योजिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांना 11 मे 1888 रोजी मांडवी कोळीवाडा येथे महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा महात्मा फुले गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव तर सूत्रसंचालन साहित्यिक ज.तू. गार्डे यांनी केले.
सौ रुपाली कचरे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
Back to top button
