फलटण(नसीर शिकलगार) – अतिवृष्टीमुळे फलटण तालुक्यात प्रचंड नुकसान सुद्धा जिल्ह्यातील चार मंत्री फिरकत नसल्याने याबाबतचे “सातारा जिल्ह्याला चार मंत्री पण एकाची पण होईना फलटण मध्ये एन्ट्री” या मथळ्याखाली सडेतोड वृत्त रक्षक रयतेचा न्यूजने प्रसिद्ध करतात आज तातडीने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे फलटण दौऱ्यावर येत आहेत.
अतिवृष्टीमुळे फलटण तालुक्यात प्रचंड नुकसान होऊन पण एकाही मंत्र्याला पाहणीं दौरा करण्याची फुरसत मिळेनाशी झाली आहे.सातारा जिल्ह्याला चार मंत्री पण एकाची पण होईना फलटण मध्ये एन्ट्री अशी अवस्था असून अडचणीच्या काळात जिल्ह्यातील चारही मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने तालुक्याचा अपमान झाल्याच्या भावना जनतेतून व्यक्त होत असल्याचे वृत्त रक्षक रयतेचा न्यूज ने सडेतोडपणे प्रसिद्ध केले होते या बातमीला खूप मोठा प्रतिसाद जनतेतून मिळाला होता. मंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त होऊ लागली होती. रक्षक रयतेचा न्यूज च्या सडेतोड बातमीच्या वृत्ताने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आज दुपारी चार वाजता फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून फलटण शहर, ठाकुरकी ,सुरवडी येथील नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत.