फलटण (कोळकी) – सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी फलटण येथील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी शंभर टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे.
प्रशालेचे इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी एकुण २६ विद्यार्थी बसले होते.यामध्ये विशेष प्राविण्य एकुण १७, प्रथम श्रेणीत ०८, व द्वितीय श्रेणीत ०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु.समरा आरिफ तांबोळी ९४.४०% गुण, कु.केशव तुषार महानवर ९४% गुण,कु.अनुष्का प्रशांत हेळकर ९३.२०% गुण,कु.ओम वैभव कर्णे ९२.४०% गुण,कु.मानसी मयुर नलवडे ९२.४०% , कु.समर्थ रमेश नाळे ९१.८०%,कु.स्वराजंली संतोष डांबे ९०.८०% गुण मिळवून यश संपादन केले.
तसेच मराठी माध्यमातून आलेली मुले इ.१२ वी इंग्रजी वाणिज्य मध्ये चांगल्या गुणांनी पास झाली. यामध्ये कु.सारा ईतिक्फ शेख ८१.३३%,कु.प्रथमेश सुनिल शिंदे ७३%, कु.चंदन रायप्पा आंबिपी ६७%, कु.ओमकार सर्जेराव ठणके ६१% कु.सौद समीर शेख ५९.३३% गुण मिळवून यश संपादित केले आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना सौ.प्रज्ञा देशमुख, निखिल कापले, ज्ञानेश्वर जाधव, सौ.पुजा साठे व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अमित सस्ते, महेंद्र कातुरे, ज्ञानेश्वर जाधव, सौ.सुजाता गायकवाड, सौ.स्नेहल भोसले, श्रीमती आशाताई भराडे या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखल्या बद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रदीप भिमराव माने, संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, कोषाध्यक्षा सौ.सविता माने, प्राचार्य अमित सस्ते,पर्यवेक्षक महेंद्र कातुरे,समन्वयिका सौ.सुजाता गायकवाड,सौ.माधुरी माने,सौ.अहिल्या कवितके, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच इ.११ वी इंग्रजी माध्यमाच्या वाणिज्य शाखेसाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आॅनलाईन प्रणालीद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत. तरी इच्छुक विद्यार्थी आणि पालक यांनी प्रवेशा संबंधित अधिक माहितीसाठी काॅलेजशी त्वरित संपर्क साधावा असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.