फलटण – फलटण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड मोठे नुकसान झाले असले तरी शहर व तालुक्यात असलेल्या ओढे ,नाले यांच्या वरील अतिक्रमणामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने ओढे नाले यांच्यावरील अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यासाठी दोन्ही गटाच्या राजकीय नेते मंडळींनी जनहितासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

फलटण शहर व तालुक्यात कोणीही अतिक्रमण करणे ही नित्याची बाब झालेली आहे. मोकळ्या जागेवर अतिक्रम होत असताना आता ओढे नाले यावर सुद्धा अतिक्रमणे होऊ लागले आहेत फलटण शहरातील ओड्यालगत अनेकांनी पक्की बांधकामे केली असून मोठ मोठ्या इमारती उभारले आहेत ग्रामीण भागात सुद्धा अशीच परिस्थिती असून पाऊस जर मोठा आल्यास ओढे नाले यांना पाणी वाहण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसत असून जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे फलटण शहरात ओड्या लगतच्या अतिक्रमणामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे.त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होत आहे.वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
यावर कारवाई करण्यासाठी नगरपालिका प्रशासन नेहमीप्रमाणे चालढकल करत आहेत. तालुक्यातून वाहणाऱ्या ओढे नाले यांची स्वच्छता करून त्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे. मात्र याकडे प्रशासन तसेच राजकीय नेते मंडळी डोळे झाक करीत आहेत. अतिक्रमानामुळे अनेकांचे नुकसान होत असताना आता तरी जागे होत फलटण तालुक्यातील दोन्ही गटाच्या राजकीय नेते मंडळींनी अतिक्रमणे जमीन दोस्त होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
ओढे नाले यांच्यावरील अतिक्रमामुळे अनेकांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने कारवाई न केल्यास अनेक जण हरित लवादाकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये अतिक्रमणाला पाठीशी अधिकारी वर्गांच्या संदर्भात सुद्धा तक्रारी होण्याची शक्यता आहे.अतिक्रमणाबाबत तीव्र भावना असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Back to top button
