स्थानिक

महायुतीच्या काही नेतेमंडळी कडून प्रोटोकॉल धाब्यावर, बैठकीत अधिकारी वर्गाला बसविले जाते कोपऱ्यात

माजी खा.रणजितसिंह, आ.सचिन पाटील,प्रांताधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज

फलटण – फलटण तालुक्यात महायुतीच्या काही नेते मंडळींकडून प्रोटोकॉल धाब्यावर बसवून अधिकारी वर्गाला त्यांच्याच कार्यालयात आडोशाला बसवले जात आहेत. अधिकारी वर्गांना काही नेते मंडळी मान देत नसल्याने जनतेमध्ये यामध्ये जोरदार कुजबूज सुरू आहे. तर दुसरीकडे प्रांताधिकारी स्वतःला खुर्ची मिळाली यावरच समाधानी राहून इतर अधिकाऱ्यांच्या प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष करत आहे.

    फलटण तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेचे चित्र पालटलेले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सचिन पाटील हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील हे लोकप्रतिनिधी असल्याने महत्त्वाच्या शासकीय बैठकींना त्यांनी अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या कार्यालयात बसणे गैर नाही. मात्र हे होत असताना हे दोघेही महायुतीचा धर्म पाळण्यासाठी इतर नेतेमंडळींना नाहक व्यासपीठावर बोलावीत आहेत. त्यांनीही व्यासपीठावर बसणे गैर नाही मात्र हे बसत असताना प्रांताधिकारी शेजारी किंवा तहसीलदार शेजारी बसण्याची आपली पात्रता आहे का याचा विचार करत नाही. परवा दिवशी आपत्कालीन परिस्थितीवर तातडीची बैठक तहसील कार्यालयात झाली ज्या तहसीलदार कार्यालयात बैठक झाली त्या तहसीलदारांनाच कोपऱ्यात बसण्याची वेळ आली. या बैठकीसाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हजर असताना सुद्धा त्यांनाही कोपरा दाखविण्यात आला. खुर्चीवर बसण्यासाठी अनेक जण हपापलेले दिसले. बैठकीमध्ये तज्ञ असल्याप्रमाणे अनेकांनी आपली मते मांडली.लोकप्रतिनिधी अधिकारी वर्गाशी बोलत असताना काहीजण मध्येच तोंड घालत आहे. वारंवार असे प्रकार घडत आहेत हे खेदजनक आहे.

जनतेसाठी पाच पैसे खर्च करत नाहीत असे काही नेते मंडळी व्यासपीठावर बघून याची सर्वत्र कुजबूज सुरू झाली आहे. 

अधिकाऱ्यांसमोर बैठक घेताना कोणाला कोठे बसवावे याबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.त्यांची सर्वांना सोबत घेण्याची चांगली भावना असली तरी महायुतीतील इतर नेते मंडळींना मान देण्याच्या नादात अधिकाऱ्यांचा अपमान होईल असे वर्तन होता कामा नये याची दक्षता रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी घेण्याची गरज आहे. 

अधिकारी वर्गांचा प्रोटोकॉलचा अभ्यास प्रांताधिकारी यांना असून सुद्धा ते त्यांना स्वतःला खुर्ची भेटली एवढेच बघत आहे इतर अधिकारी कोठे बसले आहेत याचा सारासार विचारच करत नसल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button