स्थानिक

केवळ आर्थिक लाभासाठी निवडणुकीपुरते उगविणारे अवकाळी नेते जनता अडचणीत असताना गायब

पावसामुळे नुकसान झालेल्या आपतग्रस्त बांधवांना भेटीला पण हे आले नाहीत,जनता संतप्त

फलटण – फलटण तालुक्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होऊन नुकसान झाले असताना जनतेच्या मदतीसाठी आणि दिलासा देण्यासाठी फक्त निवडणुकीपुरते उगविणारे अवकाळी नेते दिसलेच नसल्याने त्यांचे स्वार्थी ,मतलबी राजकारण उघडे पडले आहे.अडचणीचे काळात जनतेला वाऱ्यावर सोडणारी ही अवकाळी नेतेमंडळी कोठे आहेत असा प्रश्न जनतेला पडला आहे.

फलटण तालुक्यात तीन दिवसापूर्वी सलग चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची घरे उध्वस्त झाले असून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेकांची जनावरे दगावली असून आर्थिक नुकसानीमुळे आपतग्रस्त नागरिक चिंतेत आहेत. यावेळी आपतग्रस्त नागरिकांच्या मदतीला तातडीने
विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आ. सचिन पाटील, माजी आ दीपक चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर,माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर,फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके ,धनंजय साळुंखे पाटील त्यांचे कुटुंबीय,कार्यकर्ते आणि हे पावसात धावून आले लोकांना दिलासा दिला खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा ठिकठिकाणी आपतग्रस्तांच्या भेटी घेऊन दिलासा दिला.
नेतेमंडळीप्रमाणेच प्रशासकीय यंत्रणा सुद्धा मदतीसाठी सतर्क झाली होती वरील नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते जनतेच्या वारंवार संपर्कात होते एकीकडे ही नेते मंडळी जनतेची मदत करत असताना दुसरीकडे केवळ निवडणूका पुरते स्वतःचे महत्व वाढवून घेणारी काही अवकाळी नेते फिरकलेच नाहीत ते कोठे आहे याचा थांग पत्ता सुद्धा जनतेला लागला नाही. फलटण तालुक्यात निवडणूक आली की स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्यासाठी एखादा मेळावा घ्यायचा किंवा वरिष्ठ नेते मंडळींना घरी बोलवायचे,कार्यकर्त्यांना बोलवायचे, आपले महत्त्व गटाचे महत्व आणि  वाडवडीलांची पुण्याई पटवून द्यायची असा काहींनी गोरख धंदा सुरू केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पाठिंबा देण्यासाठी आर्थिक तडजोड करायची. भाषणे करायची ,निवडणुकीत प्रचारात सहभागी होऊन निवडणूक झाली की पुन्हा गायब व्हायचे असली तऱ्हा काही नेते मंडळींची सुरू आहे. अडचणीच्या काळात स्वतः कधी खिशातील पाच पैसे जनतेसाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी खर्च करण्याची लायकी सुद्धा ही मंडळी दाखवत नाहीत. यांच्याबरोबरच लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीला इच्छुक असणाऱ्या अनेकांनी निवडणूका पूर्वी मोठा खर्च केला ,तालुक्याच्या विकासाचा मोठ कळवळा दाखविला मात्र नंतर ते गायब झाले आहेत.
फलटण तालुका अडचणीत असताना साधी विचारपूस सुद्धा या नेते मंडळींनी केलेली नाही.तालुक्याला अडचणीचे काळात वाऱ्यावर सोडणाऱ्या या अवकाळी नेत्याबद्दल जनतेतून नाराजी व्यक्त होत आहेतच पण असल्या प्रवृत्तींना कोणत्याही नेतेमंडळींनी यापुढे थारा देऊ नये अशा भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button