फलटण- फलटण तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती व पूरग्रस्त झालेल्या भागामध्ये पाहणी करून नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी व रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना नंदकुमार मोरे यांनी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की मागील आठवड्यात फलटण तालुक्यामध्ये मोठी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरले पावसामुळे जिवनमान विस्कळीत झाले आहे.रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले असून पंचनामाचे काम सुरू असले तरी तातडीने पंचनामे करून तालुक्याला मदतीचे वेगळे पॅकेज द्यावे. पूरग्रस्त नागरिकांना तातडीची आर्थिक मदत द्यावी.तसेच या भागाची आपण पाहणी करावी असे निवेदन नंदकुमार मोरे यांनी दिले आहे.