श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शनि. दि 26 रोजी नवलबाई मंगल कार्यालय येथे प. पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचे उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
फलटण – श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ,शिवाजी रोड फलटणच्या वतीने शनिवार दिनांक 26 रोजी नवलबाई मंगल कार्यालय येथे प. पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचे उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीं चा अभिषेक, महाआरती, मंत्र ,नामस्मरण त्यानंतर वास्तुशास्त्र,पितृषास्त्र,संख्याशास्त्र,शिवसरोदय शास्त्र याविषयी प. पू. राजनकाका देशमुखमहाराज यांचे प्रवचन होणार आहे.त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होणार असून यावेळी भाविकांनी येताना पारायणासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.