स्थानिक
नामामध्ये मोठी ताकद आहे.नामस्मरण केल्याने मन आणि आत्मा शुद्ध होतोच पण नामस्मरण केल्याने दैवी उर्जेशी जोडले जाते – प.पु.राजनकाका देशमुख महाराज

फलटण – नामामध्ये मोठी ताकद आहे.नामस्मरण केल्याने मन आणि आत्मा शुद्ध होतोच पण नामस्मरण केल्याने दैवी उर्जेशी जोडले जात असल्याचे प्रतिपादन आध्यात्मिक क्षेत्रातील परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी केले.
श्री स्वामी समर्थ महाराजांचा 169 वा प्रकट दिन निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ,शिवाजी रोड फलटणच्या वतीने नवलबाई मंगल कार्यालय येथे प. पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचे उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
श्री स्वामी प्रकटदिनी श्रीं चा अभिषेक, महाआरती, मंत्र ,नामस्मरण त्यानंतर वास्तुशास्त्र,पितृषास्त्र,संख्याशास्त्र,शिवसरोदय शास्त्र याविषयी प. पू. राजनकाका देशमुखमहाराज यांचे प्रवचन झाले. यावेळी बोलताना नामस्मरण केल्याने आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक फायदे होतात.नामस्मरण केल्याने मन शांत होते, ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते. मन आणि आत्मा शुद्ध होतो.नामस्मरण केल्याने दैवी उर्जेशी जोडले जाते.
मन आणि शरीरात नवीन उत्साह आणि उल्हास येतोच पण वैयक्तिक अस्तित्वातून वैश्विक प्रकाशमान अस्तित्वात जाण्याचे महाद्वार उघडते.नामस्मरण केल्याने भक्त आणि परमात्म्यामध्ये थेट संबंध निर्माण होतो. ध्वनीची शक्ती आणि त्याच्या नावाद्वारे देवाशी जोडले जात असल्याचे राजनकाका यांनी सांगितले.
आज क्षणिक सुखापायी माणूस माणसाला विसरत चालला आहे त्यामुळे प्रेम आपुलकी राहिलेली नाही.आई वडिलांचाही त्यांना विसर पडला आहे .मात्र लक्षात ठेवा आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे.त्यांच्याशी प्रामाणिक रहा त्यांची सेवा करा त्यामुळे तुम्हाला भगवंताचे प्रेम मिळेल असे परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी सांगितले.
यावेळी व्यसन मुक्त संघटनेचे प्रमुख नातेपुते येथील ह भ प धैर्यशीलभाऊ देशमुख, ह.भ.प.नवनाथमहाराज शेलार यांचेही मार्गदर्शनपर मनोगते झाली
सायकाळी 6.00 वा आरती व नंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला
यावेळी दोन किलो चांदीचे आसन असलेली पंचधातूची श्री स्वामी समर्थांची मूर्तीचा अभिषेक करण्यात आला.ती काकांच्या निवासस्थानी कायमस्वरूपी दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.