फलटण – फलटण शहरातील बुधवार पेठ तानाजी चौक येथे जय हनुमान मित्र मंडळ यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे शनिवार दिनांक 12 रोजी आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे.

शनिवार दिनांक 12 रोजी पहाटे पाच ते सहा या दरम्यान श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ यांचे भजन, सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी श्री हनुमान जन्मकाळ सायंकाळी पाच ते सात रूद्रावतार ढोल ताशा पथक, सायंकाळी सात वाजता महाआरती, सायंकाळी साडेसात वाजता महाप्रसाद आणि रात्री दहा वाजता एकतारी भजन होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Back to top button
