फलटण – सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या गॅलेक्सी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फलटणच्या चेअरमनपदी सचिन यादव यांची तर व्हा चेअरमनपदी योगेश यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गॅलेक्सी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जे.पी. गावडे व साळुंखे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन बबनराव यादव यांची पुनश्च एकदा चेअरमन पदी एकमताने निवड झाली व संस्थेच्या व्हॉइस चेअरमनपदी योगेश रघुनाथ यादव यांची देखील एकमताने सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी निवड झाली. त्याबद्दल सर्व संचालक मंडळ व के बी ग्रुप ऑफ कंपनीचे कर्मचारी यांचे वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती हेमंत खलाटे यांनी दिली.