फलटण – फलटणच्या सुवर्ण परिस स्पर्श फौंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण राज्यस्तरीय झिंदाबाद समाजभूषण पुरस्कारने सांगली येथे सन्मानित करण्यात आले.
सुवर्ण परिस स्पर्श फौंडेशनच्या माध्यमातून शबाना पठाण यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी, रोजगारासाठी,अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, येथील नगरीकांनसाठी करत असलेले उत्तम कार्य तसेचं समाजातील दुर्बल घटकांसाठी अनेक चांगल्या योजनांद्वारे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करत असलेले प्रयत्न या सर्व चांगल्या उत्तम कार्याची दखल याआधी देखील वेगवेगळ्या संस्थेनी घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. आज ही त्यांच्या उत्तम कार्याची दखल घेत. झिंदाबाद या संस्थने आज दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन, सांगली येथील कार्यक्रमात शब्बाना पठाण यांना माजी खा. राजू शेट्टी यांच्या हस्ते २०२५ या वर्षीचा राज्यस्तरीय झिंदाबाद समाजभूषण पुरस्कार देवून त्यांना गौरवण्यात सन्मानित करण्यात आले. या मिळालेल्या पुरस्कारामुळे शबाना पठाण यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.