फलटण – फलटण येथील शिंपी समाज महिला मंडळाच्या नुकत्याच पदाधिकाऱ्यांच्या एकमताने निवडी जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये अध्यक्षपदी सुलभा मोहटकर यांची तर उपाध्यक्षपदी अंजली कुमठेकर, सचिव पदी रेखा हेंद्रे तर खजिनदार पदी अश्विनी हेंद्रे,सह खजिनदार पदी रुपाली टाळकुटे यांची निवड करण्यात आली
येथील शिंपी समाजाच्या विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या हॉल मध्ये महिला मंडळाच्या सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती या बैठकी मध्ये या पदाधिकाऱ्यांची एक मताने निवड करण्यात आली
निवड करण्यात आलेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे समाजातील मान्यवर व जेष्ठ व्यक्ती तसेच सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत