स्थानिक

फलटण वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी खा.रणजितसिंह आणि आ.सचिन पाटील यांच्या हस्ते संपन्न

फलटण – फलटण वकील संघाची नुकतीच पदाधिकारी निवड पार पडली. फलटण वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार माजी खासदार  रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार  सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

  फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नितीन जाधव, उपाध्यक्षपदी ॲड. सागर देशपांडे, सचिव ॲड. निलेश भोसले यांची बहुमताने निवड करण्यात आली असून सह सचिव ॲड. अभिषेक राऊत महिला सदस्य ॲड. निकिता नामदेवराव रसाळ ॲड. स्वरदा चंद्रकांत जाधव,नव निर्वाचित अध्यक्ष ॲड. नितीन जाधव व कार्यकारणीचे माजी खासदार  रणजीतसिंह नाईक निंबाळकर व फलटणचे आमदार  सचिन पाटील यांनी सत्कार केला त्यावेळी संघाचे ॲड, सचिन शिंदे, ॲड,राहुल बोराटे ॲड.विवेक ढालपे, ॲड.राजेंद्र यादव व इतर वकील हजर होते.यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर उपस्थित होते.

फलटण वकील संघाच्या माध्यमातून दिवाणी वरिष्ठ न्यायालय स्थापन करणे, पुढील भविष्यातील वीस वर्षाचा विचार करता, प्रशस्त व सर्व सोयींनी युक्त अधिकार गृह इमारती लगत नवीन सुसज्ज न्यायालय इमारत उभारणी कामी पाठपुरावा करून येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्य न्यायालय इमारत फलटणमध्ये उभे करण्याचा आश्वासन वकील संघास दिले, केंद्र व राज्य सरकार यांच्या जलद न्याय योजनेचा पक्षकारांना लाभ मिळवा, याबाबत चर्चा झाली. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय विधी न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन  रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार  सचिन पाटील यांनी फलटण वकील संघाला दिले.

    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button