स्थानिक

छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त फलटण शहरात लक्षवेधी शोभा यात्रा, बाईक रॅली आणि छ. शिवाजीमहाराज पुतळ्यास अभिषेक

      फलटण  : अखंड हिंदुस्थानचे दैवत, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सोमवार दि. २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता छ. शिवाजी महाराज चौक येथे शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे शिवचरित्रावर व्याख्यान, रात्री १२ वाजता शहरातील छ. शिवरायांच्या पुतळ्यास अभिषेक आणि अक्षय तृतीया,मंगळवार दि. २९ रोजी सकाळी ८ वा. बाईक रॅली आणि सायंकाळी ६ वा शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेली शोभा यात्रा अशा विविध उपक्रमांद्वारे फलटण शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.

        प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंतीच्या आदल्या दिवशी सोमवार दि. २८ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता एस. टी. बस स्थानकालगत असलेल्या मुख्य चौकातील छ. शिवरायांच्या अर्ध पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात येणार असून, त्यानंतर पूजा, आरती व शिवपुतळयास पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात येणार आहे. 

     मंगळवार दि. २९ मे रोजी सकाळी शिवजयंती निमित्त शहरातील प्रमुख मार्गांवरुन मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील युवक/युवती आपल्या बाईकला भगवे ध्वज लावून, तर अनेक जण शिवकालीन पोशाख घालुन या रॅली मध्ये सहभागी होणार आहेत. शहरातील प्रमुख मार्गावरुन ही रॅली जात असताना शहरवासीय रस्त्याच्या दुतर्फा उभा राहुन रॅलीचे नेहमी स्वागत करतात, यावर्षीही त्यामध्ये खंड पडणार नाही.

      सायंकाळी पारंपरिक वाद्य, ढोल ताशांच्या निनादात विद्युत रोषणाई आणि प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी तरुणाईने जय शिवाजी, जय भवानीच्या जय घोषात शिवचरित्रावरील विविध देखावे आणि छ. शिवरायांच्या प्रतिमांनी सजलेले चित्ररथांसह काढलेली शोभा यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरुन जात असताना शहरातील आबालवृद्धांनी केलेली गर्दी अवर्णणीय असणार आहे.

    मंगळवारी सकाळी ८ वाजता बाईक रॅली छ. संभाजी महाराज पुतळा, मारवाड पेठ, बारस्कर चौक, शुक्रवार चौक, शंकर मार्केट, रामेश्वर चौक मलठण, उंब्रेश्वर चौक पाचबत्ती चौक, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी भव्य दिव्य बाईक रॅली संपन्न होणार आहे.

       सायंकाळी ६ वाजता, छ. संभाजी महाराज पुतळ्यासमोर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून मिरवणूकीला सुरुवात करण्यात येणार आहे.

       मिरवणूकीमधील विद्युत रोषणाई, भगवे झेंडे घेतलेले मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक प्रतिमा व शिवचरित्रावरील देखावे सर्वांचे लक्ष वेधणारे असतील.

     मिरवणूक मार्गावर, गजानन चौक येथे उभारलेल्या छ. शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ भव्य पुतळा व चौकातील आकर्षक सजावट, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेणारी असेल.

     अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक छ. संभाजी महाराज पुतळा, मुधोजी क्लब, महात्मा फुले चौक, गजानन चौक, श्रीराम मंदिर (टोपी चौक), शंकर मार्केट, रामेश्वर चौक, उंब्रेश्वर चौक, पाचबत्ती चौक, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे मिरवणूक निघणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button