फलटण — महायुतीच्या मंत्रीमंडळात सातारा जिल्ह्यातील चार मंत्री एक उपमुख्यमंत्री त्याच बरोबर निवडून आलेले निवडून आलेले सर्व आमदार महायुतीचेच आहेत त्या मुळे त्यांनी लक्ष घालून गेली तीस वर्षे बंद असणाऱ्या फलटण तालुक्यातील झिरपवाडी ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी केली आहे.
झिरवाडी येथील ग्रामीण रूग्णालय सुरू व्हावे म्हणून गेली तीस वर्षापासून संघर्ष सुरू असून या साठी अनेक वेळा आंदोलने केली निवेदन दिली पाठपुरावा केला परंतु यश आले नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून ग्रामीण रूग्णालय सुरू व्हावे म्हणून दाद मागितली आहे न्यायालय योग्य निर्णय देईलच परंतु महायुतीच्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातील चार मंत्री तसेच जवळपास सर्वच आमदार महायुतीचेच आहेत त्या मुळे त्यांनी लक्ष घातल्यास या ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न त्वरित मार्गी लागेल अशी अपेक्षा दशरथ फुले यांनी व्यक्त केली आहे
फलटण येथील गिरवी रोडवर झिरपवाडी ग्रामपंंचायत हद्दीत ३० ते ३५ वर्षापूर्वी ८ ते १० एकर जागेत लाखो रूपये खर्चकरून ग्रामीण रूग्णालय उभारण्यात आले त्या वेळी सुसज्ज इमारत, आवश्यक वैद्यकीय साधने, सुविधा आणि पुरेसा अधिकारी/कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला असूनही रुग्णालय प्रत्यक्ष सुरु झाले नसल्याच्या त्यावेळच्या पार्श्वभूमीवर सन १९९७ मध्ये तत्कालीन राज्यपाल डॉ.पी.सी. अलेक्झांडर फलटण येथे आले असता सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना ग्रामीण रुग्णालयाची शहर व तालुक्यातील सर्वसामान्यांना गरज आहे, त्यासाठी रुग्णालय उभे करुन सर्व साधने सुविधा अगदी आवश्यक ” डॉक्टर्स व अन्य अधिकारी कर्मचारी नियुक्त करुनही सदर रुग्णालय सुरु करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणून देत ते तातडीने सुरु करण्याबाबत संबंधीतांना सूचना देण्याची विनंती केली होती, त्यानंतर सदर ग्रामीण रुग्णालय सुरु झाले मात्र ते पूर्ण क्षमतेने कधीही सुरु करण्यात आले नाही आणि अखेर बंद करण्यात आले.
कोरोना सारखे साथीचे रोग उदभवतात अशा वेळी रूग्णाना खाजगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागतो त्या मुळे त्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो जर हे ग्रामीण रूग्णालय सुरू झाले तर गोर गरीब रूग्णाना मोठा आधार मिळणार आहे
सदर इमारत गेली २५/३० वर्षे दुर्लक्षित राहिल्याने इमारतीची दारे, खिडक्या , यत्र सामुग्री अज्ञाताने काढून नेल्या असून इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या इमारतीचा गैर मार्गा साठी वापर केला जात आहे त्या मुळे या रूग्णालयाच्या इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार असून जिल्ह्यातील मंत्रीमंडळात असणारे मंत्री, आमदार यांनी लक्ष घालून गेली तीस वर्षे बंद असणारे झिरपवाडी येथील ग्रामीण रूग्णालय सुरू व्हावे या साठी प्रयत्न करावे अशी मागणी दशरथ फुले यांनी केली आहे