फलटण – महिला दिनानिमित्त बारामती या ठिकाणी जिजाऊ सेवा संघ अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती तर्फे देण्यात येणारा राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार फलटणच्या किचन क्वीन कुकिंग क्लासेस च्या संचालिका सौ नाजनिन तांबोळी यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी सौ सुनंदाताई पवार, शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ शर्मिला पवार व बारामती मधील प्रतिष्ठित महिलावर्ग उपस्थित होता. किचन क्वीन कुकिंग क्लासेस च्या संचालिका सौ नाजनिन तांबोळी यांनी सातारा पुणे आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये महिलांकरिता पाककलेचे प्रशिक्षण देण्याचे कार्य गेली पंधरा वर्षे सातत्याने काम करीत आहेत.
ग्रामीण भागातील व शहरी भागातील महिलांना व मुलींना, शाळा, कॉलेज, यूट्यूब ,फेसबुक च्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे पाक कलेचे व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे या व्यवसायात प्रशिक्षणाचा लाभ घेऊन हजारो महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि स्वतःच्या पायावर ठाम उभे राहिल्या यामध्ये हॉटेल व्यवसाय, फास्ट फूड, केक शॉप, आईस्क्रीम पार्लर ,घरगुती मेस ,केटरिंग, विविध प्रकारचे मसाले तयार करणे, फूड इंडस्ट्री मध्ये यशस्वीरित्या कार्य करीत आहेत.