फलटण – सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूल& जुनियर कॉलेज कोळकी फलटणआणि लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमान शनिवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी 10 ते 5 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूल जुनियर कॉलेज या ठिकाणी सदरचे रक्तदान शिबिर होणारा असून प्रत्येक रक्तदात्यास छावा चित्रपटाची दोन तिकिटे भेट स्वरूपात देण्यात येणार आहे किंवा प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ संध्या गायकवाड यांनी केले आहे.