महिला विशेष
महिला दिनानिमित्त महिलांच्या विविध स्पर्धांना उत्फूर्त प्रतिसाद
स्लो बाईक मध्ये भाग्यश्री देशपांडे,जलद चालणे मध्ये सुकेशनी कांबळे तर उलटे चालणे मध्ये शीतल शेंडगे प्रथम

फलटण – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी माळजाई मंदिर परिसरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शेकडो महिलांनी यावेळी उपस्थिती दर्शविली.
जागतिक महिला दिनानिमित्त माळजाई मंदिर येथे रक्षक रयतेचा न्यूज अंतर्गत महिला मंच, विनय ज्वेलर्स फलटण, माळजाई मंदिर उद्यान समिती फलटण आणि नवनिर्माण सेवा संघ फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये महिलांसाठी स्लो बाईक क्वीन स्पर्धा,साडी मध्ये जलद चालणे आणि उलट दिशेने साडी मध्ये चालणे( रेट्रो वॉकिंग) या स्पर्धा महिलांसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. स्लो बाईक क्विन साठी प्रथम क्रमांक सोन्याची नथ, द्वितीय क्रमांक पैठणी आणि तृतीय क्रमांक लेडीज हेल्मेट, साडी मध्ये जलद चालण्यासाठी प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक फार्मिंग ठुशी तृतीय क्रमांक टिफिन बॉक्स ,उलट दिसणे साडी मध्ये चालणे (रेट्रो वॉकिंग) साठी प्रथम क्रमांक पैठणी ,द्वितीय क्रमांक चांदीचे नाणे आणि तृतीय क्रमांक व्याक्युम फ्लास्क सेट ठेवण्यात आले होते. तसेच या स्पर्धेसाठी उपस्थित राहणाऱ्या महिलांना प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन सौ निशा मुळीक यांच्यावतीने पैठणी आणि अनेक बक्षिसे लकी ड्रॉ द्वारे देण्यात आली तसेच नामवैभव सिटी प्राइडच्या वतीने छावा पिक्चर ची तिकिटे देण्यात आली होती.
स्पर्धेचा शुभारंभ माळजाई मंदिर उद्यान समितीचे चेअरमन प्रमोद निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना प्रमोद निंबाळकर यांनी माळजाई परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे.येथे महिलांना बसण्यासाठी आणि फिरण्यासाठी चांगली सोय केलेली आहे.महिलांनी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे अवश्य भेट द्यावी असे आवाहन प्रमोद निंबाळकर यांनी केले.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन सौ निशा मुळीक ,लायन्स आईज हॉस्पिटलचे चेअरमन अर्जुनराव घाडगे, माळजाई मंदिर उद्यान समितीचे चेअरमन प्रमोद निंबाळकर ,सचिव विजयकुमार पाटील , महेशशेठ गरवालीया आर्किटेक्ट स्वीकार मेहता तसेंच लायन्स प्लॅटिनमच्या संस्थापक चेअरमन सौ.नीलम पाटील सौ.मंगल घाडगे,विनय ज्वेलर्सचे विशाल गांधी आदी उपस्थित होते.
स्लो बाईक स्पर्धेत
1 भाग्यश्री मयूर देशपांडे
2 वैशाली विजय घनवट
3 अर्चना संतोष गुणे
फास्ट चालणे मध्ये
1 सुकेशनी कांबळे
2 अश्विनी ननावरे
3 सुषमा नाळे
रेट्रो वॉकिंग मध्ये
1 शितल शेंडगे
2 सुषमा नाळे
3 रेश्मा ननावरे
यांनी क्रमांक मिळविले
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून परवीन मुलानी आणि शुभांगी गायकवाड यांनी काम पाहिले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रक्षक रयतेचा इव्हेंट टीमचे सौ रुपाली कचरे,सौ नंदा बोराटे,सौ अनुराधा रणवरे,सौ मनीषा घडिया,नीता दोशी,असिफा शिकलगार,प्रशांत धनवडे,कमलेश भट्टड,प्रशांत दोशी,इम्तियाज तांबोळी,तात्या गायकवाड,सौ दीपाली सपाटे,सौ कविता रणशिंग,माळजाई उद्यान समितीचे सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.या स्पर्धेसाठी रविवार पेठ तालीम मंडळाचे मोहनराव पोतेकर,ऋषीकेश बिचुकले यांचेही अनमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रम प्रसंगी रामचंद्र पांडुरंग मुळे कुटुंबियांनी दांडपट्टाचे शिवकालीन विविध खेळ साजरे करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.त्यांचा सत्कार प्रमोद निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.