स्थानिक

माजी खा. स्व.हिंदूरावजी नाईक निंबाळकर दर्गा मज्जिद ट्रस्ट मलटण येथे मोठ्या उत्साहात इफ्तार पार्टी संपन्न

सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित

फलटण – फलटण शहरातील मलटण भागातील माजी खासदार स्व.हिंदूरावजी नाईक निंबाळकर दर्गा मज्जिद ट्रस्ट मलटण येथे माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आ.सचिन पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात इफ्तार पार्टी संपन्न झाली. 

       या इफ्तार पार्टीसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील,जयकुमार शिंदे,माजी नगरसेवक अशोकराव जाधव ,सचिन अहिवळे, अजय माळवे,सुधीर अहिवळे,रणजितसिंह भोसले,अमित भोईटे, हाजी सिकंदरभाई बागवान, कादरभाई पठाण, गुलाबभाई बागवान, रज्जाकभाई बागवान,रिझवान काझी,महम्मद नदाफ,मुनीर सय्यद,सिराजभाई मुल्ला,मुनीर सय्यद,बबलूभाई बागवान,इसाकभाई बागवान,जावेदभाई मिस्त्री,मेहबूबभाई मेटकरी, रियाझभाई इनामदार,सामाजिक कार्यकर्ते सनी काकडे,अमोल सस्ते,सनी मांढरे ,लतिफभाई तांबोळी,किरण राऊत,राजेंद्र निंबाळकर,अमोल भोईटे , रमेश सोनवणे,मोहन रनवरे,प्रदीप गोडसे,रोहित नागटिळे, इजान बागवान, तौसिफ बागवान,अल्ताफ पठाण,तात्या गायकवाड आदी उपस्थित होते. 

रियाजभाई इनामदार यांनी प्रास्ताविकात माजी खा.हिंदुराव नाईक निंबाळकर,रणजितसिंह नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी कोणताही जातीभेद न करता मुस्लिम समाजाला नेहमी मदत केली आहे. मुस्लिम समाजाला दिवाळीला फराळाचे वाटप तसेच रमजान ईदला दुधाचे वाटप न चुकता या नाईक निंबाळकर कुटुंबियांकडून केले जाते.हे कुटुंबीय सर्व समाजाला जपणारे असून या मशिदीसाठी त्यांनी भरीव सहकार्य केल्याचे रियाजभाई यांनी स्पष्ट केले. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लवकरात लवकर राज्यसभेवर जाता यावे यासाठी मुस्लिम समाज प्रार्थना करेल असे त्यांनी स्पष्ट केले. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आ.सचिन पाटील यांनी उपस्थिती दर्शविली समाजाच्या अडीअडचणी समजून घेतल्याबद्दल रियाजभाई यांनी आभार मानले.

सर्वांचे स्वागत मस्जिदचे चेअरमन जावेदभाई शेख यांनी केले.चेअरमन जावेदभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्तार पार्टीचे चांगले नियोजन करण्यात आल्याबद्दल आ.सचिन पाटील यांनी कौतुक करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

या इफ्तार पार्टीसाठी मोठ्या संख्येने सर्व धर्मीय बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button