फलटण – जागतिक महिला दिनानिमित्त सोमवार दिनांक 10 मार्च रोजी माळजाई मंदिर येथे रक्षक रयतेचा न्यूज अंतर्गत महिला मंच,विनय ज्वेलर्स, फलटण , माळजाई मंदिर उद्यान समिती फलटण आणि नवनिर्माण सेवा संघ फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 10 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता माळजाई मंदिर परिसरात महिलांसाठी स्लो बाईक क्वीन स्पर्धा,साडी मध्ये जलद चालणे आणि उलट दिशेने साडी मध्ये चालणे( रेट्रो वॉकिंग) या स्पर्धा महिलांसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत.यासाठी प्रत्येकी 50 रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली असून स्लो बाईक क्विन साठी प्रथम क्रमांक सोन्याची नथ, द्वितीय क्रमांक पैठणी आणि तृतीय क्रमांक लेडीज हेल्मेट, साडी मध्ये जलद चालण्यासाठी प्रथम क्रमांक पैठणी, द्वितीय क्रमांक फार्मिंग ठुशी तृतीय क्रमांक टिफिन बॉक्स ,उलट दिसणे साडी मध्ये चालणे (रेट्रो वॉकिंग) साठी प्रथम क्रमांक पैठणी ,द्वितीय क्रमांक चांदीचे नाणे आणि तृतीय क्रमांक व्याक्युम फ्लास्क सेट ठेवण्यात आलेला आहे. तसेच या स्पर्धेसाठी उपस्थित राहणाऱ्या महिलांना प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन सौ निशा मुळीक यांच्यावतीने पैठणी आणि अनेक बक्षिसे लकी ड्रॉ द्वारे जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच छावा चित्रपटाची तिकिटे सुद्धा लकी ड्रॉ द्वारे जिंकता येणार आहे.
स्पर्धेसाठी दि 8 मार्च पर्यंत खालील ठिकाणी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.
सौ रुपाली कचरे 9226720881, सौ नंदा बोराटे 9766000320, सौ अनुराधा रणवरे 996046050, सौ मनीषा घडीया या 70204676 82 ,नीता दोशी 9420999917 ,सौ असिफा शिकलगार 8010239062