महिला विशेषस्थानिक

जागतिक महिला दिनानिमित्त द्वारका पेट्रोलियम ( Jio) तर्फे बरड येथे कर्तबगार महिला सन्मानित

फलटण (गुणवरे).. जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील कर्तबगार महिलांना एक आदर्शवत असा सामाजिक वसा व वारसा जपत द्वारका पेट्रोलियमचे मालक तुकाराम गौंड  यांच्या हस्ते महिलांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपली कर्तव्य जगाला दाखवून देणाऱ्या आई-बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण अशा विविध रूपात पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्री वर्गाला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून द्वारका पेट्रोलियमचे मालक  तुकाराम गौंड( मा. उपविभागीय पोलीस अधिकारी),. दीपक गौंड( कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य फलटण) पत्रकार राजू बनसोडे व शशिकांत आढाव यांच्या हस्ते महिलांना सन्मानचिन्ह, फुलांचा गुच्छ व शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी राहुल शेंबडे (मॅनेजर) ऋषिकेश लोंढे, अमोल लोंढे, सतीश गौंड ,समीर गौंड, अजित वाघमारे तसेच सौ. अश्विनी ठेंबरे( पोलीस पाटील बरड )सौ. कचरे मॅडम( ग्राहक सेवा केंद्रSBI) , सखुबाई वाघमारे…. या महिला भगिनी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button