स्थानिक

गॅलेक्सी को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि., फलटणच्या पुणे जिल्ह्यातील पहिल्या शाखेचा पिंपरी चिंचवड येथे मोठ्या उत्साहात शुभारंभ

    फलटण  : गॅलेक्सी को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि., फलटण आगामी काळात भरभराटीला येऊन, पुणे जिल्ह्यात जास्तीत जास्त शाखा सुरु होतील अशी अपेक्षा व्यक्त करताना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी गॅलेक्सी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकारी यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    फलटण, जि. सातारा येथे मुख्यालय असलेल्या गॅलेक्सी को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि., फलटण या संस्थेच्या पुणे जिल्ह्यातील पहिल्या शाखेचा शुभारंभ नुकताच पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक चेअरमन व उद्योजक सचिन यादव, संचालिका सौ. सुजाता सचिन यादव यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

      संस्थेचे संस्थापक चेअरमन व के. बी. उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गॅलेक्सी पतसंस्थेने आपल्या मजबूत आर्थिक सेवा आणि समुदायाच्या विकासासाठी व सामाजिक बांधिलकी जपत झपाट्याने नावलौकिक मिळविला आहे. संस्थेच्या स्थापनेपासूनच अतिशय पारदर्शक आणि ग्राहकांना प्रभावी सेवा देऊन संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच विविध आकर्षक सुविधा, बचत योजना राबवून सर्वसामान्यांना बचतीची माहिती देऊन सहकारात सामील करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे मोलाचे काम केले आहे. सभासद, ग्राहक व हितचिंतक यांच्या अडचणींचे काळात आर्थिक सहाय्य देऊन ग्राहकांच्या मनात संस्थेबद्दल एक वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे यावेळी संचालिका सौ. सुजाता सचिन यादव यांनी निदर्शनास आणून दिले.

      संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारे लोकहिताला प्राधान्य देवून अविरत सेवा देत भविष्यात संस्थेचे व ग्राहकांची जीवनमान उंचावण्याचे स्पष्ट आश्वासन यावेळी सचिन यादव यांनी दिले. 

       गॅलेक्सी को-ऑप. संस्थेस नुकताच मिळालेला ऑडिट वर्ग “अ” म्हणजे संस्थेच्या प्रामाणिकपणाची आणि पारदर्शक कारभाराची पोहोच पावती आहे. प्रारंभी केवळ सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या गॅलेक्सी संस्थेने पुणे जिल्ह्यात आपल्या कामकाजाचा विस्तार करण्याची अधिकृत परवानगी मिळवून पिंपरी चिंचवड येथे पुणे जिल्ह्यातील पहिली शाखा सुरु करुन एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. सन २०१९ मध्ये स्थापनेपासून सातारा जिल्ह्यातील जनतेची यशस्वीपणे सेवा करणाऱ्या या अग्रगण्य सहकारी संस्थेसाठी हा विस्तार एक मोठे पाऊल आहे.

     गतिमान नेतृत्व व दृष्टीकोन आणि नाविन्यपूर्ण धोरणांसाठी ओळखले जाणारे सचिन यादव यांनी सहकाराच्या सेवा पुणे जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीकोन व्यक्त केला आहे, ज्याचा उद्देश दर्जेदार आर्थिक उपायांची वाढती मागणी पूर्ण करणे हा आहे. सोसायटीच्या विस्तारामुळे पुण्यातील रहिवाशांसाठी, विशेषतः बचत, कर्जे आणि इतर आर्थिक सेवांच्या क्षेत्रात नवीन संधी मिळतील अशी अपेक्षा आहे.

  गॅलेक्सी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., फलटण या संस्थेने सातारा जिल्ह्यात विश्वासाचा एक भक्कम पाया तयार केला असून, आपल्या सदस्यांना यशस्वीरित्या आर्थिक सेवा प्रदान केल्या आहेत. या सेवा व उद्दिष्टांच्या विस्तारासह, या सहकारी संस्थेचे पुण्यात आपल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचे धोरण आहे. सातारा जिल्ह्यातील गॅलेक्सी को-ऑप. क्रेडिट सोसायटीची यशस्वी घोडदौड पुणे जिल्ह्यात सुद्धा अशीच चालू राहील असा विश्वास संस्थेचे कर्मचारी, ग्राहक आणि सभासदांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button