फलटण – सोलापूर जिल्हातील पंढरपूर येथे दिनांक 23 व 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य सब जुनिअर मैदानी स्पर्धेत फलटणचा राजवीर धीरज कचरे याने 10 वर्षाखालील वयोगटात 100 मीटर धावणे 14.27 सेकंद व 50 मीटर धावणे 7.52 सेकंद या क्रीडा प्रकारांमध्ये सलग तीन वर्ष सुवर्णपदक मिळवले हा गुणवान वेगवान धावपटू ठरला कोल्हापूर 2023, सांगली 2024 व पंढरपूर 2025 येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मैदानी क्रीडा स्पर्धेत सलग तीन वर्षे ठरला वेगवान धावपटू म्हणून त्याची ओळख आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या स्व. शिलादेवी शरद कुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर कोळकी ता.फलटण या ठिकाणी इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे या यशस्वी खेळाडूला फलटण एज्युकेशन सोसायटीचे मैदानी खेळाचे प्रशिक्षक राज जाधव,तायाप्पा शेंडगे , धीरज कचरे, सचिन फाळके (पोलीस अधिकारी) यांनी मार्गदर्शन केले. या फलटणच्या गुणवान वेगवान धावपटूचे विद्यानगर गणेश उत्सव सांस्कृतिक क्रीडा मंडळ फलटण,फ्रेंड्स हेल्थ क्लब फलटण ,फलटण शहर यांनी अभिनंदन केले