स्थानिक

आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांचा वाढदिवस दि.30 रोजी उत्साहात साजरा होणार विविध कार्यक्रमांचे आयोजन

फलटण  – फलटण तालुक्याचे भाग्यविधाते विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचा गुढीपाडव्याच्या दिवशीचा वाढदिवस यावर्षी अत्यंत उत्साहाने विविध स्पर्धा, लोकोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याचे आवाहन फलटण कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केले आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती आ.रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठकीमध्ये ते बोलत होते दीपक चव्हाण पुढे म्हणाले आ. रामराजे यांचा वाढदिवस हा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा असतो. दरवर्षी तो उत्साहाने साजरा केला जातोच. यावर्षी तो अधिक उत्साहाने साजरा करण्याचे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेने ठरवले असून वाढदिवसानिमित्त शहरासह गावोगावी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, फळे वाटप ,चित्रकला, वक्तृत्व ,रांगोळी, गायन स्पर्धा त्याचबरोबर समाज उपयोगी अनेक कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी केले जाणार आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण पुढे म्हणाले तालुक्यात धोमबलकवडी निरा देवघर या धरणांच्या माध्यमातून तालुक्यात पाणी पोहोचवून तालुक्यातील दुष्काळी भागाचे नंदनवन करण्याचा त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये प्रयत्न केलेला आहे. एमआयडीसी च्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला त्यांनी काम दिलेलं आहे. फलटण तालुका सुजलाम, सुफलाम करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले आहे. अशा लोकनेत्याचा वाढदिवस आपणा सर्वांसाठी ऊर्जा स्तोत्र असून तो उत्साहाने साजरा करणार आहोत.यामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे ते म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button