फलटण – फलटण मधील मुस्लिम समाजाचे आणि राजघराण्याचे खूप जुने प्रेमाचे संबंध असून इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सर्व धर्म समभावाची चांगली भावना जपली जात असल्याचे गौरवोद्गार विधान परिषदेचे माजी सभापती, आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काढले.

फलटण शहरातील ऐतिहासिक बादशाही मस्जिद मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. मुस्लिम बांधवांना यावेळी रमजान ईदच्या शुभेच्छा श्रीमंत रामराजे आणि श्रीमंत अनिकेतराजे यांनी दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर,बाळासाहेब मेटकरी,सनी अहिवळे,प्रमोद निंबाळकर ,पप्पूभाई शेख, जॉनी पलंगे ,बापू गावडे, अमरसिंह खानविलकर ,शक्ती भोसले,भाऊ कापसे,अभिजीत जानकर ,अतुल मोहोळकर, सिकंदर डांगे, शाकीर महात ,अस्सलमभाई मोदी ,असिफ शेख ,आसिफ भाई मेटकरी, सादिकभाई बागवान,जमशेदभाई पठाण बशीरभाई शेख,हाजी इसाकभाई शिकलगार, फिरोजभाई शेख, रफिकभाई आतार, वजीर भाई आतार ,इकबालभाई आतार ,निजामभाई आतार ,कमरूददीन डांगे, जफर आतार मुस्ताकभाई मेटकरी, रफिकभाई मेटकरी, बबलू बागवान ,रफिकभाई बागवान, नदीम पटेल ,इम्तियाज काजी ,आबिद खान , अयाज शेख, जाहिद डांगे, निसार आतार, हैदर शेख,इम्रान कुरेशी आदी हिंदू आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते.
Back to top button
