फलटण- स्वराज फाउंडेशन, फलटण शहर भारतीय जनता पार्टी व माऊली फाउंडेशन फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक व भाजपचे शहराध्यक्ष अनुप शहा यांनी दिली.
आज रविवार दिनांक 2 फेब्रुवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत अहिंसा मैदान बारस्कर गल्ली फलटण येथे हळदीकुंकू समारंभ माजी जिल्हा परिषद सदस्या सौ जिजामाला नाईक निंबाळकर व सौ मनीषा नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी उपस्थित महिलांमधून पहिले बक्षीस म्हणून 31 मानाच्या ओटी, दुसरे बक्षीस इलेक्ट्रिक इस्त्री, तिसरे बक्षीस पाणी तापवण्याची कॉइल, चौथे बक्षीस सिलिंग फॅन ,पाचवे बक्षीस 15 ड्रायफूट सेट ,सहावे बक्षीस 11 हेअर टू टो सर्विसेस, सातवे बक्षीस दोन लेडीज पर्स, आठवे बक्षीस दोन ज्यूसर व नववे बक्षीस 200 लिटरचे दोन बॅरल असे ठेवण्यात आले आहेत. फलटण शहर व तालुक्यातील सर्व महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अनुप शहा यांनी केले आहे