फलटण – महाशिवरात्र निमित्त बुधवार दि.26 फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ,शिवाजी रोड फलटणच्यावतीने प. पु .राजनकाका देशमुख महाराज यांच्या शुभराज निवासस्थान महादेव माळ कोळकी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि 26 रोजी सकाळी 9 ते 2 वा शंभू महादेवाला अभिषेक, महाआरती, मंत्र ,नामस्मरण होणार आहे. त्यानंतर प पू राजनकाका देशमुखमहाराज यांचे प्रवचन होणार आहे.त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. तरी या धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ बुधवार पेठ,शिवाजी रोड फलटणच्या वतीने करण्यात आले आहे.