ललगुन- ललगुण (तालुका खटाव)येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत बाल बाजाराचे व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरपंच पूजा विजय भोसले, माजी सरपंच जयवंत गोसावी, रोहिणी कैलास घाडगे,
बबन दादा घाडगे,प्रताप दादा घाडगे, ललगुण केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन खोत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल काटकर, उपाध्यक्ष मीनाक्षी अजित घाडगे, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
बाल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पालेभाजी,खाऊ गल्लीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थांची आकर्षक मांडणी केली होती. सकाळी साडेनऊ ते साडेबारा या तीन तासांमध्ये सुमारे 40 हजार रुपयांची उलढाल या छोट्याशा बाजारात झालेली आढळली. सातवीतील विद्यार्थिनींनी तयार केलेले हॉटेल हे या बाल बाजाराचे वैशिष्ट्य ठरले. सुमारे एक हजार आठशे रुपयांची विक्री या मुलींनी केली. सुमारे 200 महिलांनी हळदीकुंकू समारंभात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक विश्वास चौधरी, सुनील मदने , संध्या निलेश गावित, शुभांगी उत्तम पवार, विजया माळी, पूजा शिरतोडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.