फलटण – आसू येथील एकास जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्षभूमिवर आ.सचिन पाटील यांनी तातडीने आसू गावी भेट देत अधिकारी वर्गाला योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
आज मा.खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आ .सचिन पाटील यांनी आसू येथील विराज सतीश पवार (वय १३) यांस जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे याच्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली व त्यांना आधार दिला. तसेच आसू गावातील पशुवैधकीय केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गावातील गटार, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था, स्वच्छता तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी व पशुवैद्याधिकारी यांचेकडून कामात हलगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनात आले असता याची गंभीर दखल घेऊन त्यांना कामात कुसूर करू नये व नागरिकांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा अश्या शब्दात दखल घेऊन त्यांना यापुढे नागरिकांची तक्रार वर त्वरित निरसन करण्यासंबंधी सूचना केल्या तसेच आजार पसरू नयेत याबाबत काळजी घेण्यात यावी तश्या अधिकारी याना सूचना दिलेल्या आहेत. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुंभार , तालुका आरोग्य अधिकारी दिघे , भाजप तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, विशाल माने, अमोल लवळे , ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते