फलटण – सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत जिल्हा सातारा व फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प फलटण यांच्यातर्फे दिनांक 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सेवा भारती या सामाजिक संस्थेमार्फत फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा प्रकल्प फलटण तालुक्यामध्ये अठरा वर्षे राबविला जात आहे या प्रकल्पाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम घेतले जातात या कार्यक्रमापैकी एक म्हणजे निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबीर होय यावर्षीचे निवासी शिबिर दिनांक 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालयात संपन्न होत आहे.
दिनांक 28 रोजी सकाळी साडेदहा वाजता याचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्या ॲड जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. दिनांक 28 रोजी तारांगण व भारत माता पूजन हे कार्यक्रम होणार आहेत दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 2 वाजता या शिबिराचा समारोप लायन्स क्लब अध्यक्ष जगदीश करवा यांच्या अध्यक्षतेखाली सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत अरुण केळकर, सातारा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मधुसूदन फणसळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.