फलटण – फलटण येथील तुलसी एक्सीडेंट हॉस्पिटलचे प्रमुख ,माजी नगरसेवक आणि दिशा समितीचे सदस्य डॉक्टर प्रवीण आगवणे यांची रुग्ण कल्याण समिती उपजिल्हा रुग्णालय फलटण च्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील रुग्ण कल्याण समिती अंतर्गत नियामक समितीमध्ये आमदार निर्देशित सदस्य नियुक्त करण्याबाबत आमदार सचिन पाटील यांनी डॉक्टर प्रवीण आगवणे यांची निवड करण्याबाबत सुचवले होते त्याप्रमाणे त्यांची निवड करण्यात आली आहे. फलटण उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अंशुमन धुमाळ यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र डॉक्टर आगवणे यांना दिले आहे.
या निवडीबद्दल डॉक्टर प्रवीण आगवणे यांचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील, माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या ॲड जिजामाला नाईक निंबाळकर ,स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर आदींनी अभिनंदन केले आहे.
Back to top button
