फलटण – विधानसभा निवडणुकीनंतर राजे गटाला एका मागोमाग धक्के बसत असून माजी नगराध्यक्ष दिवंगत नंदकुमार भोईटे यांचे पुतणे व उद्योजक अमित भोईटे तसेच श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन प्रमोद खलाटे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हा राजे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

फलटण तालुक्यात तीस वर्षाहून अधिक काळ सत्ता राखलेल्या राजे गटाला विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला त्यानंतर एका मागोमाग एक राजेगटाचे कार्यकर्ते माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मध्ये प्रवेश करत आहे. कोळकी गावांमधील सुद्धा अनेक कट्टर राजे समर्थक भाजपामध्ये प्रवेश करत असल्याने राजे गटात अस्वस्थता आहे.
अशातच फलटणचे माजी नगराध्यक्ष दिवंगत नंदकुमार भोईटे यांना मानणारा कार्यकर्त्यांचा एक मोठा गट असून त्यांच्या पश्चात त्यांचे पुतणे अमित भोईटे हे गट सांभाळत होते. त्यांनी राजे गटाला धक्का देत आज माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. तसेच मलटण मधील श्रीराम सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रमोद खलाटे यांनी सुद्धा भाजपामध्ये प्रवेश केला असून यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव,सचिन अहिवळे उपस्थित होते.
आगामी काही दिवसात राजेगटाचे आणखी मोठे नेते आणि कार्यकर्ते घराणेशाही आणि मनमानी कारभाराला कंटाळून माजी खा . रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे यावेळी अशोकराव जाधव यांनी सांगितले.
Back to top button
