पुणे.. पुणे येथे झालेल्या अबॅकस चॅम्पियन ऑफ चॅम्पियन स्पर्धेमध्ये गुणवरे गावची सुकन्या कु. ओजस्वी संदेश गौंड हिने 600 मुलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तसेच तिची मलेशिया येथील पुढील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गुणवरे (तालुका फलटण)# येथील प्रगतशील बागायतदार व डायनामिक्स डेअरीचे गुणवरे येथील संचालक रामदास बाबासाहेब गौंड यांची ओजस्वी ही नात आहे. तसेच इसराइल येथे डेअरी कोर्स करणारे आधुनिक पद्धतीने शेती करणारे संदेश गौंड यांची सुकन्या आहे. तिचे आई-वडील .तसेच आजी आजोबा माजी ग्रामपंचायत गुणवरे सदस्य होते हे कुटुंब उच्चशिक्षित असून आजोबा माजी उपसरपंच गुणवरे येथे होते. तसेच गावातील हे प्रतिष्ठित कुटुंब असून एक चुलते निलेश गौंड (तहसीलदार मीरा-भाईंदर ) मुंबई येथे तहसीलदार या पदावर कार्यरत आहेत. तसेच दत्तात्रय भरणे (कॅबिनेट मंत्री) हे या कुटुंबाचे अत्यंत जवळीचे नातेवाईक आहेत. ओजस्विने मिळवलेल्या या यशामुळे गुणवरे व पंचक्रोशीतील नागरिकांनी व ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..