फलटण – सरस्वती शिक्षण संस्था संचलित, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी, फलटण या ठिकाणी ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णामाई फौंडेशन व निकोप हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. जे.टी.पोळ,सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भिमराव माने ,लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष जगदिश करवा, सुहास निकम, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भुजबळ, रमेश नाळे, युवा जनमतचे संपादक युवराज पवार, सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड,सौ.उज्वला निंबाळकर,योगा प्रशिक्षिका सौ.विद्या शिंदे आणि मनिषा कांगणी, प्राचार्य अमित सस्ते,पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका सौ.सुजाता गायकवाड,सौ.माधुरी काटकर ,सौ.अहिल्या कवितके यांच्यासह सर्व विद्यार्थ्यी,पालक आणि शिक्षक उपस्थित होते.

यावेळी प्रशालेच्या वतीने प्रथमता प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचे विद्यार्थ्यांनी रोपे देऊन स्वागत केले . त्यानंतर ध्वजारोहण डॉ.जे.टी.पोळ यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विद्यार्थ्यीनींनी राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हणत राष्ट्रध्वजास सलामी दिली.
प्रमुख पाहुणे, शिक्षक, विद्यार्थी, व पालक यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी परेडद्वारे मानवंदना दिली. यानंतर प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी सई पवार हिने विषद केले.माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यीनींनी मेरी मिट्टी मेरी शान,तर प्राथमिकच्या विद्यार्थ्यीनींनी शक्ती समृद्धतम मुक्ती समृद्तम् या देशभक्तीपर गीतांद्वारे राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडविले.एल.के.जी व यु.के.जी आणि प्राथमिक च्या विद्यार्थ्यांनी महापुरुष तसेच स्वातंत्र्यवीर यांच्यावरती उत्तम भाषणे व त्यांची घोषवाक्ये सादर करून त्यांच्या स्वातंत्र्य समरातील योगदान सांगितले.पूर्व – प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी बाल नाटिकेद्वारे पर्यावरण वाचवा,प्रदुषण टाळा,सकस आहार इ.विषयी महत्वपूर्ण संदेश दिला.सबका साथ,सबका विकास या नाटिकेद्वारे इयत्ता अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यीनींनी भारत देशातील विविध क्षेत्रातील होत असलेला विकास मांडला.देशभक्तीपर गीतांवर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी लेझीम तर माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण उत्कृष्टपणे केले.
यावेळी डॉ. जे.टी पोळ यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास आणि गुणवत्तेचे विशेष कौतुक करून संस्थेला शुभेच्छा दिल्या व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व विद्यार्थी व पालकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले .त्यानंतर इतर मान्यवरांनीही शुभेच्छा दिल्या. सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून थोर राष्ट्र पुरूषांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पूर्व – प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवरील अतिशय सुंदर व प्रबोधनात्मक आकर्षक चित्रांचे व हस्तकला प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला व विशेष कौतुकही केले.यासाठी कला शिक्षिका सौ.दिपा पडळे यांच्यासह विद्यार्थ्यी आणि सर्व शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अमित सस्ते यांनी, सूत्रसंचालन सौ.सुवर्ण निकम व सौ. सुषमा नाळे यांनी केले.आभार सौ.सीमा शिंदे यांनी मानले.
Back to top button
