स्थानिक

प.पू. गोविंद महाराज उपळेकर यांच्या 137 व्या जन्मोत्सव सोहळ्याचे दि.28 ते 31 जानेवारी दरम्यान आयोजन

फलटण : फलटण येथील प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्या वतीने प.पू. गोविंद महाराज उपळेकर यांच्या 137 व्या जन्मोत्सव सोहळ्याचे 28 ते 31 जानेवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम असे –

हरिभजन : दु. 3 ते 5 वा., प्रवचन सेवा : सायं. 5.30 ते 7 वा., ‘श्रीं’ची आरती : सायं. 7.15 वाजता. मंगळवार, दि. 28/1/2025 रोजी दुपारी 3 ते 5 भजन (केशवस्मृती भजनी मंडळ), प्रवचन सायं. 5.30 ते 7.00 वाजता ‘श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज यांचे चरित्र व शिकवण’ या विषयावर. प्रवचनकार : ह.भ.प.स्वामी शंकरनाथ महाराज, आळंदी- पुणे.बुधवार, दि. 29/1/2025 रोजी दुपारी 3 ते 5 केसकर मावशी भजनी मंडळाचे भजन.गुरुवार दि. 30/1/2025 रोजी दुपारी 3 ते 5 शारदा भजनी मंडळाचे भजन.शुक्रवार, दि. 31/1/2025 रोजी ‘श्रीं’चा 137 वा जन्मोत्सव सोहळा माघ शु॥ 2 शके 1946 पहाटे 4 वाजता ‘श्रीं’चा जन्मकाळ, पहाटे 6 ते 8.30 : लघुरुद्र, सकाळी 9 ते 12.00 : जय गिरनारी श्री दत्त पंथी सोंगी भजनी मंडळ वलझडवाडी (खंडाळा) यांचा सोंगी यांचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी 12.30 ते 3.00 : महाप्रसाद, दुपारी 4 ते 6 : श्री उत्तरेश्‍वर भजनी मंडळ दहाबिघे, विडणी यांचा भजनाचा कार्यक्रम, सायं. 6 ते 7 : ‘श्रीं’ची फलटण शहरामध्ये पालखी प्रदक्षिणा, सायं. 7.15 वा. : ‘श्रीं’ची आरती.

या सोहळ्याचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा, असे आवाहन प.पू.गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्था फलटणचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,  अनिरुद्ध अरविंद रानडे (उपाध्यक्ष),  हेमंत वसंतराव रानडे (कोषाध्यक्ष), श्रीमंत सुभद्राराजे प्र.ना.निंबाळकर (सचिव),  बाळकृष्ण साधूराव कणसे,  अनिल राधाकृष्ण तेली,  प्रविण प्रतापराव रणवरे, शंतनु श्रीकांत रुद्रभटे व  महेश माधवराव बरसावडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button