स्थानिक

लायन क्वेस्ट’ आधुनिक काळाची गरज,प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

फलटण (कोळकी) – लायन्स इंटरनँशनल तर्फे फलटण कोळकी येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकीमध्ये २ दिवस शिक्षकासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये २१ शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. शिक्षकांची कार्यशाळा घेणेसाठी इंटरनँशनल ट्रेनर पुणे येथून डाँ. ज्योती तोष्णीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यांनी उमलत्या वयातील मुलांसाठी सामाजिक, भावनिक कौशल्यावर आधारीत शिक्षण या विषयावर दोन दिवस सविस्तर मार्गदर्शन केले.

   या २ दिवस प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यशाळेचे आयोजन लायन क्लब फलटण गोल्डन अध्यक्ष लायन सौ.स्वाती चोरमले यांनी केले. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन रिजन चेअरमन ला.दिलीप वहाळकर सातारा, यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करून सकाळी 10.30 वा. करण्यात आले. त्यांनी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. २ दिवस शिक्षकांसाठी असलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता प्रोग्रेसिव्ह काँन्व्हेट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधे रविवार दि.२९ सप्टेबर रोजी सांयकाळी ५वा झाली. या कार्यक्रमासाठी लायन डिस्ट्रिक्ट ३२३४ ड १ चे प्रांतपाल एम.जे.फ.अँड ला.एम.के.पाटील, हे खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षीत शिक्षकांना इंटरनँशनल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.या प्रसंगी खास पाहुणे म्हणून सरस्वती शिक्षण संथेचे आधारस्तंभ श्री.पांडुरंग पवार (भाऊ) व व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, ला.गंगाप्रसाद बंडेवार प्रातीय प्रशासकीय अधिकारी,श्री.संदिप चोरमले अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था फलटण,ला.रणजित निंबाळकर, डिस्ट्रिक्ट चेअरमन ला.सुहास निकम,ला.चंद्रकांत कदम.व लायन क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्ष ला.स्वाती चोरमले.सचिव ला.संध्या गायकवाड खजिनदार ला.सिता जगताप, प्रोजेक्ट को आँर्डीनेटर ला.उज्वला निंबाळकर, ला.सुनंदा भोसले, ला.सुनिता कदम,ला.दिपा निंबाळकर, ला.दिपा शिंदे, उपस्थित होते. या वेळी लायन क्वेस्ट कायमस्वरुपी प्रकल्प राबविणार असलेचे संस्थेने जाहीर केले व कायमस्वरुपी प्रकल्पाचे उदघाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला.अँड.एम के पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी लायन्स क्लब फलटण गोल्डन व प्रोग्रेसिव्ह काँन्व्हेट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button