स्थानिक

कवी मुकुंद मोरेंचा तिसरा काव्यसंग्रह ‘तुझ्या शहरातली ही पहाट’ मोठ्या थाटामाटात प्रकाशित

फलटण – विविध वेब सिरीज, सिरियल यामध्ये गाणी लिहनारे प्रसिद्ध कवी मुकुंद मोरे यांचा तिसरा कवितासंग्रह ‘तुझ्या शहरातील ही पहाट’ नुकताच थाटामाटात प्रकाशित करण्यात आला. 

    फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात हा प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. तुझ्या शहरातली ही पहाट या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, ममता सिंधुताई सपकाळ, प्राचार्य विश्वासराव देशमुख, प्रसिद्ध अभिनेते रामदास जगताप, निर्माते-दिग्दर्शन डॉ. कुंडलिक केदारी यांच्या हस्ते झाला. यावेळी अनेक पत्रकार, कवी मुकुंद मोरे यांचा मित्र परिवार, अनेक मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. कवी मुकुंद मोरे यांच्या ‘तुझ्या शहरातली ही पहाट’ या काव्यसंग्रहाचं मान्यवरांनी कौतुक केले.

Oplus_131072

   या ‘काव्यसंग्रहातील कविता या अतिशय सुंदर आहेत. यात मुक्तछंदही आहे. या कवितांमध्ये गेय आहे. तर काही कवितांच्या रचना या गझलसारख्या आहेत. त्याचबरोबर कवितासंग्रहात विषयांच वैविध्य आहे,’ असं ज्येष्ठ साहित्यिका ममता सिंधुताई सपकाळ यांनी सांगितलं. त्यांनी त्वांड पोळलं वाटतं ही कविताही व्यासपीठावर म्हटली.

चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरीजफेम अभिनेता, दिग्दर्शक रामदास जगताप यांनी कवी मुकुंद यांच्या जुन्या कविता आणि गाण्यांची आठवणी जागवल्या. तसंच प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनीही ‘तुझ्या शहरातली ही पहाट’ या काव्यसंग्रहाचं तोंड भरून कौतुक केले.

उपस्थित मान्यवरांनी कवी मुकुंद मोरे यांच्या काव्य प्रतिभेची प्रशंसा केली. त्यांच्या प्रेमकवितांबरोबरच विद्रोही कविताही तितक्याच काळजात भिडतात. हा कवितासंग्रह मनाचा ठाव घेणारा आहे, अनेक कविता या हृदयाला भिडणाऱ्या आहेत. तर कवी मुकुंद मोरे यांनी अनेक कवितांमधून धर्म, सामाजिक विषमता, लोकशाही, ढोंगीपणा याच्यावर परखड भाष्य केले आहे. एकूणच तुझ्या शहरातली ही पहाट हा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या पसंतीस उतरणारा आहे, असे मत अनेकांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button