फलटण – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 194 व्या जन्मदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा चे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक राजेंद्र बोराटे यांनी रक्तदान केले. यावेळी समता परिषद फलटण चे अध्यक्ष बापुराव शिंदे, कोळकी तंटामुक्ती चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते,संत सावतामाळी ट्रस्ट चे संचालक गोविंद भुजबळ, सातारा जिल्हा माळी महासंघाचे अध्यक्ष, महानुभव पंथ ट्रस्ट चे संचालक बाळासाहेब ननावरे, दैनिक लोकमत चे फलटण तालुका प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते विकास शिंदे,संत सावता माळी ट्रस्ट चे संचालक विजयदादा शिंदे फलटण तालुका वारकरी सांप्रदायिक मंडळ अध्यक्ष दादासाहेब शेंडे, फलटण शहर माळी समाज संघटना शहर अध्यक्ष रोहन शिंदे व मान्यवर उपस्थित होते.
Back to top button
