फलटण – काळज येथील रॉयल किड्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा आणि मुलांना खाऊवाटप करण्यात आले.

काळज, ता. फलटण येथील रॉयल किड्स इंग्लिश मीडियम स्कूल अल्पकालावधीतच नावारूपाला आलेली ग्रामीण भागातील पहिली सीबीएसई बोर्ड स्कूल आहे. रॉयल किड्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात झेंडावंदन करून साजरा करण्यात आला.
लहान मुले देशभक्तीने प्रेरित व्हावेत व आपल्या देशाबद्दल त्यांच्या मनात आदर व प्रेम निर्माण व्हावा यासाठी स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. दिपाली ननावरे म, शिक्षिका सौ. अलिशा मुलानी , सौ. मोनाली ननावरे व इतर स्टाफ यांनी योग्य नियोजन करून विविध उपक्रमांद्वारे व मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा केला.
रॉयल किड्स इंग्लिश मीडियम स्कूल ही ग्रामीण भागातील लहान मुलांना अतिशय कमी फी मध्ये शिक्षण देत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातील पालकांना आपल्या मुलांना या स्कूलमध्ये कमी खर्चात उत्तम शिक्षण मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पालक वर्गात समाधान व्यक्त केला जात आहे.
तसेच स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. दिपाली ननावरे यांनी काळज परिसरातील साखरवाडी, सुरवडी, संगमनगर, नांदल, मुळीकवाडी, घाडगेमळा, काळज, तडवळे ढोंबाळवाडी, तरडगाव व खराडेवाडी या भागातील शेतकरी वर्गातील गरीब कुटुंबातील लहान मुलांना शाळेची आवड व्हावी यासाठी २०२४-२५ या चालुवर्षीचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे असे सांगुन या भागातील सर्व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ०३ फेब्रुवारीपासून स्कूल शी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. तसेच मुलांना स्कूलमध्ये येण्या-जाण्यासाठी गाडीचे सुद्धा नियोजन केले आहे. खाली गाडी ड्रायव्हरचा सुद्धा नंबर दिला गेला आहे. इच्छुक पालकांनी खालील नंबर वर संपर्क साधावा…संपर्क क्रमांक : 7249609870,9322665026
स्कूल चा पत्ता – :
रॉयल किड्स इंग्लिश मीडियम स्कूल,
हॉटेल सहकार च्या पाठीमागे, लोणंद-फलटण हायवे लगत, काळज
Back to top button
