लोणंद – जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उज्वल यश मिळविल्याबद्दल गुलालाची उधळण करीत डी जे च्या तालावर खंडाळा तालुक्यातील निंबोडीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय बाल क्रीडा स्पर्धा नुकत्याच सातारा येथील शाहू स्टेडियम येथे पार पडल्या. या स्पर्धेत निंबोडी शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांच्या वतीने डी. जे. च्या तालावर आणि गुलालाची उधळण करत विजयी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.
निंबोडी शाळेने जिल्हास्तरावर रस्सीखेच क्रीडा स्पर्धेत लहान गटात रस्सीखेच मुली प्रथम क्रमांक, रस्सीखेच मुले प्रथम क्रमांक व रस्सीखेच मुली मोठा गट द्वितीय क्रमांक तर मोठा गट मुली 4 × 100 रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला होता. स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका हसीना पटेल, नवनाथ शिंदे, दीक्षा भोसले, इम्तियाज तांबोळी, प्रदीप भिसे,गिरीश धायगुडे, धनश्री शिंदे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाला निंबोडीचे माजी सरपंच भाऊसाहेब शेळके, सोपानराव शेळके, सरपंच धनाजी शेळके, उपसरपंच सौ मंदाकिनी शेळके,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत शेळके, उपाध्यक्ष सुनीता बोडरे, अधिक शेळके, पोपट शेळके,गणेश शेळके, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, पालक आदींची उपस्थिती होती.
Back to top button
