फलटण – फलटण मधील पत्रकार संजय जामदार यांनी सायकलवरून कुंभमेळासाठी जाण्याचा संकल्प केला असून प्रयागराज येथे होणाऱ्या महा कुंभमेळ्यासाठी सायकल वरून त्यांचे फलटण मधून प्रयागराज कडे प्रस्थान झाले. यावेळी त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
संजय जामदार यांना लहानपणापासूनच प्रवासाची आणि देवधर्माची आवड आवड असल्यामुळे ते नेहमी सायकलवरून नर्मदा परिक्रमा ,पंढरपूर पंजाब घुमान आशा अनेक यात्रा करत आहेत. त्यांचे कार्य नवीन तरुणांना प्रेरणादायी देणारे आहे.

त्यांचा जाण्याचा प्रवास 16 ते 18 दिवसाचा आहे. फलटण, पंढरपूर ,तुळजापूर, औसा, लातूर ,नांदेड, माहूरगड, यवतमाळ ,वर्धा, नागपूर, जबलपूर, कटनी, दिवा, प्रयागराज असा त्यांचा प्रवास आहे त्यांच्या प्रवासाला अनेक मित्र कंपनी शुभेच्छा दिल्या. रक्षक रयतेच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा
Back to top button
